Bajaj ने आणली ग्राहकांसाठी परवडणाऱ्या दरात बाईक ; इतकी आहे किंमत?
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑगस्ट २०२२ । सध्या पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहे. यादरम्यान, अनेक वाहनधारक स्वस्त आणि जास्त मायलेज देणाऱ्या गाड्यांना प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. अशातच दुचाकी व तीनचाकी वाहन निर्मितीत अग्रेसर असलेल्या बजाजने ग्राहकांसाठी परवडणाऱ्या दरात बाईक आणली आहे. बजाज ऑटोने 125X बाईक लाँच केली आहे.
या बाईकची किंमत 71,345 रुपये आहे (एक्स-शोरूम, दिल्ली). यामुळे ही भारतातील सर्वात स्वस्त 125cc बाईक बनली आहे. नवीन Bajaj CT 125X बजाज CT 110X पेक्षा सुमारे 5,000 महाग आहे. बाईक तीन रंगांमध्ये ऑफर करण्यात आली आहे. ग्राहकांना ब्लॅक व निळ्या कलर कॉम्बिनेशनसह मिळते तर दुसरे मॉडेल ब्लॅक आणि रेड कलर कॉम्बिनेशनसोबत व तिसरे मॉडेल ब्लॅक व ग्रीन कलर कॉम्बिनेशनसह उपलब्ध होणार आहे.
बजाजची ही बाईक बाजारात Honda Shine व्यतिरिक्त Hero Super Splendor आणि TVS Radeon सारख्या बाईकशी स्पर्धा करेल. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, CT 125X ला अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, USB चार्जिंग पोर्ट आणि LED DRL सेटअप आहे. बाईकच्या सीटची उंची आणि लांबी अनुक्रमे 810mm आणि 700mm आहे. त्याचा व्हीलबेस 1285mm आहे. यात गोल हेडलॅम्प, एलईडी डीआरएल, रबर टँक पॅड, क्रॅश गार्ड, फोर्क गेटर्स आणि लार्ज ग्रॅब रेल यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.
या नवीन बाईकमध्ये बसण्याची क्षमता देखील चांगली देण्यात आली आहे. बाइकचे सिंगल पीस सीट बरेच लांब असल्याने परिणामी मागे बसलेली व्यक्ती आणि रायडर दोघांनाही पुरेशी जागा मिळेल. कंपनीने बाईकच्या बॉडीवर्कवर फारसे काम केलेले नाही पण रोज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या लोकांना लक्षात घेऊन ही बाईक मार्केटमध्ये आणण्यात आली आहे.