जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२२ । देशभरात महागाईने कळस गाठला आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईने जनता त्रस्त झाली आहे. आता अशातच ऐन सणासुदीच्या दिवसात वीज दरवाढीचा पुन्हा शॉक बसणार आहे. पॉवर सिस्टिम ऑपरेशन कोऑपरेशन लिमिटेडचे बिल महाराष्ट्रसह 13 राज्यानी थकवले. त्यामुळे हे थकबाकी भरण्यासाठी जनतेवर वीज दरवाढ लादली जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
त्यावेळी इतर राज्यांच्या वीज प्रकल्पामधून वीज घेता येते मात्र या पॉवर अॅक्शनसाठी पॉवर सिस्टीम ऑपरेशन कोऑपरेशन लिमिटेडची परवानगी लागते. त्यासाठी वीज बिल राज्यांना द्यावे लागते परंतु 13 राज्यानी पॉवर सिस्टीम ऑपरेशन कोऑपरेशन लिमिटेडचे 5000 कोटी रुपये थकवले आहेत.
पॉवर एक्सचेंज करण्यास नकार
ही बाकी भरल्याशिवाय पॉवर एक्सचेंज करण्यास नकार देण्यात आला आहे, त्यामुळे आता 13 राज्यातील वीज कंपन्यांना पॉवर एक्सचेंज करता येणार नाही. थकबाकीचे ओझे ग्राहकावर टाकले जाणार असून पर्यायाने वीज बिल महागण्याची दाट शक्यता आहे.
महाराष्ट्रासह 13 राज्यातील जनतेला फटका
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने आजपासून नवीन नियम जारी केले असून थकबाकी 7 महिन्यात भरण्याची मुदत असून पॉवर सिस्टीम ऑपरेशन कोऑपरेशन लिमिटेडच्या निर्णयाचा फटका 13 राज्यांना बसणार आहे. महाराष्ट्रासह तामिळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान, कर्नाटक, छत्तीसगड, मणीपूर, मिझोराम आणि जम्मू-काश्मीरमधील वीज कंपन्यांना थकबाकी भरल्याशिवाय आता पॉवर एक्सेंजमधून वीज खरेदी करता येणार नाही.