⁠ 
सोमवार, सप्टेंबर 23, 2024
Home | बातम्या | आज जन्माष्टमी साजरी करताय? ‘या’ वेळपर्यंतच असणार शुभ मुहूर्त

आज जन्माष्टमी साजरी करताय? ‘या’ वेळपर्यंतच असणार शुभ मुहूर्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दरवर्षी भारतातील मंदिरे आणि धार्मिक संस्थांमध्ये श्रीकृष्ण (Shri Krishna) जन्माष्टमीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हा सण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरा केला जातो. यावर्षी कृष्ण जन्माष्टमीच्या तिथीबाबत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. काही लोकांनी 18 ऑगस्ट 2022 रोजी जन्माष्टमीचा सण साजरा केला तर काही लोक आज 19 ऑगस्ट 2022 रोजी जन्माष्टमी साजरी करत आहेत. दरम्यान, जर तुम्ही आज जन्माष्टमीचा सण साजरा करत असाल, तर जाणून घेऊया शुभ मुहूर्त, रोहिणी नक्षत्र आणि भगवान श्रीकृष्णाच्या पूजेची पद्धत.

जन्माष्टमी शुभ मुहूर्त?
अष्टमी तारीख सुरू – 18 ऑगस्ट 2022 रात्री 09:20 वाजता
अष्टमी तारीख संपेल – 19 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 10:59 वाजता
निशिता पूजेच्या वेळा – 20 ऑगस्ट, 12:20 am ते 01:05 am

रोहिणी नक्षत्र :
यंदा रोहिणी नक्षत्रात जन्माष्टमी साजरी होणार नाही. 18 आणि 19 तारखेला रोहिणी नक्षत्र तयार होत नाही. यावर्षी रोहिणी नक्षत्र 20 ऑगस्ट 2022 रोजी पहाटे 1:53 वाजता सुरू होईल आणि 21 ऑगस्ट 2022 रोजी पहाटे 4:40 वाजता समाप्त होईल. भाद्रपदाच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला भगवान श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात झाला होता, त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्राचे खूप महत्त्व आहे.

जन्माष्टमी पूजा विधी :
जन्माष्टमीच्या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून उपवास करावा. यानंतर भगवान श्रीकृष्णाला दूध आणि गंगाजलाने स्नान करून स्वच्छ रेशमी वस्त्रे परिधान करा. आज जन्माष्टमी पूजेचा मुहूर्त रात्री 10:59 मिनिटांपर्यंत राहील. श्रीकृष्णाच्या जन्माची वेळ रात्री 12.00 वाजता आहे. रात्री 12.00 वाजता शक्य असल्यास श्रीकृष्ण जन्माचे पाळणा गीत गायावे. श्रीकृष्णाला लोणी आणि साखरेचा नैवेद्य दाखवावा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही खीर आणि पंजिरीही देऊ शकता. यानंतर भगवान श्रीकृष्णाची पूजा व आरती.

उत्सवाची पद्धत
या दिवशी रात्री बारा वाजता पूर्ण दिवस उपवास करून कृष्ण जन्म साजरा केला जातो. त्यानंतर प्रसाद घेऊन उपवास पूर्ण करतात किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी गोपाळकाल्याच्या प्रसाद घेऊन उपवास सोडतात.

(टीप : वरील सर्व बाबी जळगाव लाईव्ह केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून जळगाव लाईव्ह कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.