वाणिज्य

राकेश झुनझुनवालांनी 5 हजारांपासून सुरु केला प्रवास, इतक्या कोटींचे होते मालक, जाणून घ्या बिग बुलची कहाणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑगस्ट २०२२ । शेअर बाजारातील बिग बुल म्हटले जाणारे राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचे रविवारी निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. भारताचे वॉरन बफे म्हणून ओळखले जाणारे झुनझुनवाला यांनी गेल्या महिन्यात ५ जुलै रोजी ६२ वा वाढदिवस साजरा केला. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या झुनझुनवालाचा बिग बुल बनण्याचा रोमांचक प्रवास आहे. चला जाणून घेऊया बिग बुल बनण्याची कहाणी…

राकेश झुनझुनवाला यांनी कॉलेजमध्ये असताना 1985 मध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यावेळी BSE सेन्सेक्स 150 अंकांच्या आसपास होता आणि झुनझुनवाला यांनी अवघ्या 5,000 रुपयांची गुंतवणूक सुरू केली. मात्र, त्यावेळी ही रक्कमही खूप जास्त होती. आता राकेश झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती सुमारे ४६ हजार कोटी रुपये होती.

राकेश झुनझुनवाला यांना टाटा टीकडून शेअर बाजारात पहिला विजय मिळाला. 1986 मध्ये झुनझुनवाला यांनी 5 लाखांचा नफा कमावला होता. त्यांनी टाटा टीचे 5000 शेअर्स खरेदी केले. बघता बघता अवघ्या तीन महिन्यांत तो १४३ च्या पातळीवर पोहोचला. त्याचे पैसे 3 पटीने वाढले.

राकेश झुनझुनवाला यांच्या आधी हर्षद मेहता (Harshad mehta) शेअर बाजारातला बिग बूल होता. हर्षद मेहता घोटाळ्यानंतर झुनझुनवाला यांनी शेअर्स विकून भरपूर पैसा कमावला. झुनझुनवाला यांनी स्वत: एका मुलाखतीत सांगितले की, त्यांनी शेअर्स विकून खूप पैसा कमावला. तो बिअरचा भाग होता. अशाच एका बेअर कार्टेलचे Bear Cartel नेतृत्व मनू मानेक करत होते, ज्याला ब्लॅक कोब्रा म्हणून ओळखले जाते, त्यात राधाकिशन दमानी आणि राकेश झुनझुनवाला यांचा समावेश आहे. हर्षद मेहता यांच्यावर बनवलेल्या स्कॅम 1992 या वेबसिरीजमध्येही या सर्वांचा उल्लेख आहे. पत्रकार सुचेता दलाल यांनी 1992 मध्ये हर्षद मेहता घोटाळा फोडला, त्यानंतर शेअर बाजार कोसळला.

2003 मध्ये स्वतःची ट्रेडिंग फर्म सुरू केली
1987 मध्ये राकेश झुनझुनवाला यांनी रेखा झुनझुनवालासोबत लग्न केले. ती शेअर बाजारातील गुंतवणूकदारही होती. 2003 मध्ये राकेश झुनझुनवाला यांनी स्वतःची स्टॉक ट्रेडिंग फर्म Rare (RARE) एंटरप्रायझेस सुरू केली. स्वतःची आणि पत्नीची नावे एकत्र करून हे नाव देण्यात आले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button