रावेर

रेल्वेच्या गलथान कारभाराचा केळीला फटका ; सावदा स्टेशनवर दिवसभर पडून असते कापलेली केळी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२२ । गेल्या अनेक वर्षांपासून सावदा रेल्वे स्टेशन येथून दिल्ली च्या बाजार पेठेत रेल्वे द्ररे केळीची वाहतूक केली जात आहे परंतु रेल्वेच्या गलथान कारभारामुळे केळी ला मोठा फटका बसत आहे असा आरोप केळी फळबागायतदार युनियनने रेल्वे स्थानक येथे पत्रकार परिषद मध्ये केला आहे. यावेळी डी के महाजन ,नरेश सतेच्या ,प्रवीण डिंगरा ,राहुल पाटील ,वसंत महाजन, प्रथमेश डाके, विठ्ठल पाटील यांचे सह शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

रेल्वेचा गेल्या महिना दोन महिन्यापासून अनागोंदी कारभार चालू असून वॅगन्स वेळेवर उपलब्ध करून न देता उशिरा रात्री उपलब्ध करून देत आहे त्यामुळे कापलेली केळी दिवसभर तशीच मालधक्क्यावर पडून असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते. दरम्यान या समस्या विभागीय रेल्वे अधिकारी डीआरएम यांच्याकडे मांडल्या परंतु डीआरएम केळी उत्पादक शेतकऱ्यांची एकही ऐकत नाहीत तर लोकप्रतिनिधी यांच्या सूचनेकडे देखील दुर्लक्ष करीत असतात रेल्वे कडे पुरेशी मनुष्यबळ नाही ड्रायव्हर गार्ड उपलब्ध नाही अशी उडवा उडीचे उत्तरे रेल्वे विभागीय कार्यालयातून शेतकऱ्यांना मिळत असतात रेल्वेच्या भरोशावर परिसरात केळी मोठ्या प्रमाणात वाढली असून या रेल्वेच्या अनागोंदी कारभारामुळेच आता केळी संपत चालली आहे.

सकाळची वेळ देऊन रात्री उशिरा डबे मिळतात ऑपरेटिंग सिस्टम याला जबाबदार असल्याचा ठपका विभागीय कार्यालयाकडून देण्यात येतो त्यामुळे शेतकऱ्यांची हजारो कोटी रुपयांची केळी संपण्याच्या मार्गावर असून रेल्वेला केळी वॅगन्स वाहतुकीतून मोठा महसूल मिळत असताना रेल्वे जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करीत आहे केळी परप्रांतातील बाजारामध्ये वेळेवर पोहोचत नसल्याने केळी चा भाव पडत असतो व यादरम्यान शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते सकाळी आठ वाजेपासून केळीचे कामगार कामावर येत असतात परंतु रात्री उशिरा बारा ते दोन वाजेपर्यंत त्यांना काम करावे लागत असते यात महिला पुरुष देखील असतात यामुळेच रेल्वेच्या गलथान कारभाराचा मोठा फटका केळीला बसत आहे असा आरोप यावेळी फळबागायतदार युनियनने केला आहे या दरम्यान फळबागायतदार युनियनच्या काही सदस्यांनी रेल्वे रोज वॅगन्स उपलब्ध करून देत नाही अन्यथा रोज वॅगन्स सावदा स्थानकावरून भरल्या जातील.

किसान रेल्वे 27 ऑगस्ट पर्यंत बंद आहे त्यामुळे पारंपारिक बीसीएन व्हॅगन्स केळी उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच आम्ही उपलब्ध करून देत असतो सावदा रेल्वे स्टेशनवर वीज डब्यांचा रॅक लावण्यात आला होता हे डबे एक्झामिनेशन साठी स्टेशनवर नेण्यात आली असल्याने व काही तांत्रिक अडचणीमुळे वॅगन्स वेळेवर पोहोचायला उशीर होत आहे यात यापुढे वॅगन्स कशा वेळेवर पोहोचतील याकडे लक्ष देण्यात येईल. शिवराज मानसपुरकर सीनियर डीसीएम ,भुसावळ विभाग, लोकप्रतिनिधीच्या सूचनेकडे ही दुर्लक्ष
लोकशाहीत अंतिम शब्द लोकप्रतिनिधीचा असतो परंतु लोकप्रतिनिधीच्या सूचनेकडे ही रेल्वे प्रशासनाचे मग्रूर अधिकारी दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे आता शेतकऱ्यांनी न्याय नेमका कोणाकडे मागावा असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारला आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button