जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२२ । मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत पाऊस बरसत आहे. अनेक ठिकाणी पूरपरिस्थितीही निर्माण झाली आहे. यातच आता अजून तीन दिवस पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. Rain Alert In Maharashtra Today
या जिल्ह्यांना अलर्ट जारी :
दरम्यान राज्यातील पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर या भागात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याचबरोबर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदूरबार, कोल्हापूर, अकोला, अमरावती, गोंदिया या भागात येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर बुलडाणा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
खानदेशात दोन दिवसांपासून मध्यम ते जोरदार पाऊस झाला. काही भागांत नाल्याकाठच्या जमिनी खरडून गेल्या. जळगाव जिल्ह्यात देखील दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली. मागील दोन ते दिवसापासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरु आहे,. तसेच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी झालेल्या पावसाने पिके पाण्याखाली गेली आहे.