⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 29, 2024
Home | वाणिज्य | खुशखबर..! स्वातंत्र्य दिनापूर्वीच खाद्यतेल आणखी स्वस्त होणार?

खुशखबर..! स्वातंत्र्य दिनापूर्वीच खाद्यतेल आणखी स्वस्त होणार?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२२ । खाद्यतेलाच्या (Edible Oil) वाढत्या किमतीने होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांना दिलासा मिळताना दिसतोय. मागील काही दिवसात खाद्यतेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. दरम्यान, आता स्वातंत्र्य दिनाच्या उत्साह द्विगुणीत करण्यासाठी तेल कंपन्या लवकरच तेलाच्या किंमती कमी करण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वसामान्यांना खाद्यतेलाच्या बाबतीत पुन्हा सुखद दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

परदेशी बाजारात खाद्यतेलाचे दर कमी झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या किरकोळ किमतीत घसरण होऊ शकते. अन्न आणि ग्राहक मंत्रालयासोबत (Consumer Affair) झालेल्या बैठकीनंतर खाद्यतेल प्रक्रिया आणि उत्पादकांनी तेलाच्या किंमती कमी करण्यास सहमती दर्शवली आहे. घसरलेल्या किमतींचा फायदा घरगुती ग्राहकांनाही व्हावा, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. स्वातंत्र्य दिनाच्या अगोदरच सर्वसामान्यांना स्वस्त तेल मिळण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जागतिक बाजारात तेलाच्या किंमती आटोक्यात आल्यानंतर देशातंर्गत तेलाच्या किंमतीही कमी होतील. यापूर्वी जुलै महिन्यात खाद्यतेलाच्या दरात प्रति लिटर 30 रुपयांची कपात करण्याची घोषणा अन्न उत्पादने (Manufacturing Company) बनवणारी कंपनी अदानी विल्मर यांनी केली होती.

तेल दरात इतक्या रुपयाची होणार घसरणार?
रिपोर्ट्सनुसार, जागतिक बाजारात किंमती कमी झाल्यानंतर तेल कंपन्यांनी देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाचे दर कमी करण्यास सहमती दर्शवली आहे. आगामी काळात खाद्यतेलाच्या किरकोळ किंमती 10 ते 12 रुपयांनी कमी होऊ शकतात. मात्र, गेल्या महिन्यातही तेल उत्पादकांनी दर कमी केले होते. पण जागतिक किंमती घसरल्यानंतर अजूनही भावकपातीला वाव आहे, असे मंत्रालयाचे मत आहे. त्याला कंपन्यांनी अनुकूल प्रतिसाद दिला आहे. आता किंमती 10 ते 12 रुपयांनी घसरण्याची शक्यता आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.