⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 30, 2024
Home | वाणिज्य | विक्रमी उच्चांकावरून सोने 4000 रुपयांनी स्वस्त ; हा आहे आजचा 10 ग्रॅमचा दर

विक्रमी उच्चांकावरून सोने 4000 रुपयांनी स्वस्त ; हा आहे आजचा 10 ग्रॅमचा दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२२ । आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या भावात मात्र घसरण झाली आहे. आज सोने 100 रुपयांनी महाग झाले आहे. त्यामुळे 10 ग्रॅम सोने आज 52,140 रुपयांना उपलब्ध आहे. तर आज चांदी 200 रुपयांनी स्वस्त झाली आहे. त्यामुळे आज चांदीचा एक किलोचा भाव 57,838 रुपयावर पोहोचला आहे. Gold Silver Rate Today

सोने विक्रमी उच्चांकावरून 4,080 रुपयांनी स्वस्त
सोने विक्रमी उच्चांकावरून 4,080 रुपयांनी स्वस्त होत आहे. ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५६२०० रुपये इतका होता. आज जर २४ कॅरेट सोन्याच्या किमतीची MCX च्या फ्युचर्स किमतीशी त्याच्या सर्वकालीन उच्च किंमतीशी तुलना केली, तर सोने त्याच्या विक्रमी उच्च मूल्यापेक्षा खूपच स्वस्त विकले जात आहे.

महाराष्ट्रातील दर
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,500 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,830 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,530 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,580 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,530 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,580 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,530 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 51,580 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 577 रुपये आहे. तर जळगावमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 48,630 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 51,060 रुपये आहे.उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

दरम्यान, ,आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची घसरण होत आहे. यूएसमध्ये सोन्याचा भाव $3.86 च्या वाढीसह $1,789.43 प्रति औंसवर आहे. दुसरीकडे, चांदी $0.01 च्या वाढीसह $20.21 प्रति औंस पातळीवर व्यवहार करत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.