जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२१ । ज्या कंपनीला भारतात कुठेही रेमेडी सिवर इंजेक्शन विकण्याची परवानगी नाही अशा ब्रूक फार्मा कंपनी चे इंजेक्शन माजी आमदार शिरीष चौधरींनी अमळनेरात मूळ किमतीपेक्षा जास्त दरात विकून गोरख धंदा केला व वरुन आव आणत म्हणतात की आम्ही जनसेवा केली असा सवाल आमदार अनिल पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत केला. त्यांचा काळाबाजार रोखण्याचे काम केले म्हणून त्यांचा जळफळाट होतोय असा पलटवार देखील आमदार पाटील यांनी केला. या चौधरी बंधुनी जर एक नंबर चे काम केले तर नक्कीच त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करेल असे विनम्र आवाहन देखील करायला ते विसरले नाहीत.
परवा माजी आमदार शिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषदेत जे आमदार अनिल पाटलांवर आरोप केले होते त्यास प्रतिउत्तर म्हणून काल त्यांच्या निवासस्थानी आमदार पाटील यांनी उत्तर दिले. दरम्यान वाटप झालेले इंजेक्शन आम्ही तपासायला पाठवणार आहोत ते घातक निघाल्यास जे जे कुणी दोषी ठरतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास भाग पाडू असा इशारा देखील आमदार पाटील यांनी दिला. भारतात फक्त सात कंपन्यांना रेमी डीसीवर विक्रीची परवानगी आहे.
एफडीएच्या माध्यमातून ही परवानगी घ्यावी लागते त्यानंतरच याची विक्री करता येते ब्रूक फार्मा कंपनी च्या प्रती वायल ची किंमत 500 रुपये पर्यंत असून ही एक्सपोर्टची किंमत आहे. परंतु माजी आमदारांनी ते पंधराशे ते सतराशे रुपयाला विकून जनतेची सेवा केली आहे का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला पुढे बोलताना ते म्हणाले की मागील वर्षाच्या कोविंड काळापासून सतत प्रशासन, डॉक्टर्स, व खाजगी हॉस्पिटल्स च्या संपर्कात आहे. किमान आठवड्यात एक वेळा तरी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन रुग्णांची विचारपूस करून त्यांना मिळणाऱ्या सुविधांचा आढावा घेत आहे.
हे मला न विचारता जे रुग्ण ऍडमिट होते हवं तर त्यांना जाऊन विचारा मी प्रत्यक्ष त्यांना भेटत होतो की नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली. माझे अँटी जन झाली असता मी पॉझिटिव्ह आलो व घरातच विलग करून घेतले नंतर rt-pcr मध्ये दोन वेळा निगेटिव्ह आलो मला माय बाप जनतेचा आशीर्वाद आहे. मी टाळूवरचे लोणी खाणारा माणूस नाही असे प्रत्युत्तर देखील त्यांनी दिले.