जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२२ । केंद्र सरकारकडून मुलींच्या भविष्याचा विचार करून काही योजना राबविल्या जात आहे. त्यात एक म्हणजे सुकन्या समृध्दी योजना (Sukanya Samrudhi Yojana). जर तुम्हालाही तुमच्या लेकीचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित रहावे, तिला कधी पैशांची कमतरता जाणवू नये, असे वाटत असेल तर ही योजना फायदेशीर ठरू शकते. या योजनेत गुंतवणूक करुन तुम्ही तुमच्या कन्येचे भविष्य सुरक्षित करु शकता. या योजनेंतर्गत तुमची कन्या २१ व्या वर्षीच लखपती बनू शकते. Sukanya Samrudhi Yojana News
विशेष म्हणजे पहिले दोन मुलींचे खाते उघडल्यानंतर करात सवलत मिळत होती. एका मुलीनंतर जुळ्या मुली झाल्या, आता दोघींसाठीही खाते उघडण्याबाबत नवीन नियमानुसार तरतूद करण्यात आली आहे. तीन मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मुलगी दहा वर्षात खाते ऑपरेट करु शकते, असे नियम होता. परंतु, आता सज्ञान झाल्यानंतर म्हणजेच १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर खाते ऑपरेट करु शकते. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुमची कन्या २१ व्या वर्षीच लखपती बनू शकते. जर दररोज ४१६ रुपये जमा केले तर मुलीसाठी ६० लाखापेक्षा जास्त रक्कम बनेल अशा प्रकारे मोठा लाभ मिळू शकेल.
ही योजना बेटी बचाव, बेटी पढाव अभियानाचा एक भाग आहे. योजनंेतर्गत बंॅक किंवा पोस्ट ऑफीसमध्ये खाते उघडता येते. हे खाते २१ वर्षापर्यंत किंवा १८ वर्षानंतर मुलीचे लग्न होईपर्यंत सुरु ठेवता येते. या खात्यात वर्षात कमीत कमी २५० रुपये जमा करणे आवश्यक आहेत. ही रक्कम जमा न झाल्यास खाते डिफॉल्ट मानण्यात येते. नवीन नियमानुसार खात्याला पुन्हा सक्रिय केले नाही. तरीही खात्यात जमा रक्कमेवर व्याज मिळत राहिल. अशा खात्यांवर पोस्ट कार्यालयातून बचत खात्यासाठी लागू व्याज मिळेल. नागरिकांंनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
असे उघडता येईल पोस्टात खाते
पोस्ट ऑफिसमधून अर्ज घेऊन आवश्यक दस्ताऐवज जमा करावेत. मुलीच्या जन्माचा दाखला आवश्यक आहे. आई-वडिलांचे ओळखपत्र, पॅनकार्ड, रेशनकार्ड, वाहन परवाना, पासपोर्ट, वीजबिल द्यावे लागेल. बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर सुकन्याचे खाते उघडले जाते. या योजनेचा अनेक कुटुंबांना लाभ मिळत आहे. योजनेतील अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. जनसामन्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.