जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२२ । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी एका कार्यक्रमात महाराष्ट्राबाबत केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यपालांच्या विधानाचा अनेक नेत्यांनी निषेध केला असून अशातच आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) इशारा दिला आहे. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो अस इशारा राज ठाकरे यांनी राज्यपालांना दिला आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे यांनी ट्विट करून राज्यपालांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. त्यात ते म्हणाले की, आपल्याला महाराष्ट्राच्या (Maharshtra) इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल (Governor) हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे म्हणून आपल्याविरूध्द बोलायला लोक कचरतात, परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात. महाराष्ट्रात मराठी (Marathi) माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का? उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो अस इशारा राज ठाकरे यांनी राज्यपालांना दिला आहे.
राज्यपालांचा व्हिडीओ व्हायरल
त्यावर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सुध्दा राज्यपालांना संभाळून बोलण्याचा इशारा दिला आहे. राज्यपाल यांचं काल रात्री एक भाषण सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राबाबत चुकीचं वक्तव्य केल्याचं अनेक राजकीय नेत्यांनी म्हटलं आहे.
यापुर्वी देखील राज ठाकरे यांनी जाहीर सभेत राज्यपालांना चुकीची वक्तव्ये करु नका असा इशारा दिला होता. त्याचबरोबर पुन्हा असं वक्तव्यं महाराष्ट्रात सहन केलं जाणार नाही असं देखील म्हटलं होतं. काल त्यांनी वक्तव्य केल्यापासून शिवसेना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्यावरती जोरदार टीका केली आहे.