जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२२ । राज्यात गेल्या अनेक दिवसापासून पाऊस सुरुच आहे. काही ठिकाणी अक्षरश:पावसाने थैमान घातले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळतेय. दरम्यान, राज्यात आणखी काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. ओडिशावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे शनिवारी राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. आता अशात राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. जळगाव जिल्ह्यातही पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकरी दुखावला आहे.
बंगालच्या उपसागरात हंगामातील दुसरे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे मोसमी वाऱ्यांचा जोर कायम आहे. दुसरीकडे पश्चिम किनारपट्टीवर दक्षिण गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मध्य भारतावरून जाणारा पश्चिम- पूर्व कमी दाबाचा पट्टा (मान्सून ट्रफ) त्याच्या सर्वसाधारण स्थानापेक्षा दक्षिणेला आहे. या स्थितीच्या प्रभावामुळे राज्यात पुढील पाच दिवस सक्रिय मान्सूनची स्थिती राहील, असे ‘आयएमडी’ने हवामान अंदाजात म्हटले आहे.
कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर धुळे,नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, अहमदनगर,सांगली,मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
त्यात कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर धुळे,नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, अहमदनगर,सांगली,मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकणातील पालघर, रायगड रत्नागिरीत अतीवृष्टीचा इशार देण्यात आला आहे. यासह पुणे आणि साताऱ्यात अती मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामान केंद्राने 13 जुलै पर्यंत हा अलर्ट जारी केला आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. पुढील पाच दिवस पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यांतून मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तर सांगली, सोलापूर जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.
मुंबईत हाय टाईड येण्याची शक्यता
मुंबईत थोड्या थोड्या विश्रांतीने पावसाच्या सरी बरसत आहेत. येत्या 24 तासात मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने याबाबत अलर्ट जारी केला आहे. तसेच या काळात हायटाईड येण्याची शक्यता असल्याने चौपाटी किंवा समुद्रकिनारी जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत शनिवारी हाय टाईड येण्याची शक्यता असल्याने समुद्रकिनारी आणि चौपाट्यांवर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या काळात 3.6 मीटरच्या म्हणजे सुमारे 11 फूटांच्या लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नदीकाठी असणाऱ्या गावांना इशारा
पालघर, रायगड, पुण्यातील काही जिल्हे, रत्नागिरी, कोल्हापूर आणि या जिल्ह्यांमधून सलग पाच दिवस जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणसह मुंबईमध्ये सलग पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून कळवण्यात आले आहे. पुढील पाच दिवस पाऊस जोरदार कोसळणार असल्याने नदीकडील गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जळगावसह अहमदनगर नाशिकमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस
तर धुळे,नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, अहमदनगर,सांगली,मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जळगाव, अहमदनगरसह सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विजांसह गडगडाट
ढगांच्या गडगडाटासह विजांसह जोरदार वारा पावसाची शक्यता पुढील दोन ते तीन दिवस जालना, परभणी, बीड आणि हिंगोली जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहेत, तर काही भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.