चला चला पंढरीला! भुसावळहुन पंढरपूरसाठी सुटणार दोन दिवस गाड्या
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२२ । कोरोनामुळे मागील २ वर्षांपासून वारकरी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाऊ शकले नाही. मात्र आता कोरोनाचे सावट दूर झाल्याने वारकरी विठ्ठल भेटीसाठी आतुर झाले आहेत. यंदा वारीत वारकऱ्यांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातील भाविकांसाठी भुसावळ ते पंढरपूर अशा स्पेशल (Railway) रेल्वे सुटणार आहे.
आषाढी वारी (Ashadhi Wari) करत अनेक भाविक यापुर्वी पंढरपुरकडे (Pandharpur) मार्गस्थ झाले आहेत. परंतु, आषाढीला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी अजूनही काही भाविक जात आहेत. शिवाय, काही भाविक ते आषाढीपुर्वी विठुरायाचे दर्शन घेवून परतीच्या मार्गावर असतात. अशा भाविकांसाठी रेल्वेची सुविधा करण्यात आली आहे. यामुळे भाविक व वारकऱ्यांसाठी लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनतर्फे करण्यात आले आहे.
पंढरपुरला जात असलेल्या भाविकांसाठी भुसावळ रेल्वे स्थानकहुन ९ आणि १० तारखेला विशेष भुसावळ ते पंढरपूर रेल्वे गाड्या सुटणार आहे. हीच रेल्वे पंढरपूरहून पुन्हा भुसावळसाठी मार्गस्थ होईल. आषाढी एकादशीनिमित्त भुसावळ रेल्वे मंडळतर्फे नऊ आणि दहा या दोन दिवस विशेष गाड्या सोडण्यात येत असल्याने (Jalgaon) जळगाव, धुळे, नाशिक, बुलढाणा या जिल्ह्यातील भाविक व वारकऱ्यांनी लाभ घ्यावा; असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.