रेल्वेच्या ‘या’ बोगीत आरक्षण बंद, जाणून घ्या रेल्वेचे मोठे अपडेट
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२२ । तुम्ही प्रवासासाठी जास्त वेळ ट्रेनचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. खरं तर, कोरोनाच्या काळात रेल्वेने ट्रेनच्या जनरल डब्यातही आरक्षणासह प्रवास करणे बंधनकारक केले होते. आता पुन्हा रेल्वेच्या जनरल डब्यातून आरक्षणाशिवाय प्रवास करता येणार आहे.
आरक्षणाशिवाय सर्वसाधारण डब्यातून प्रवास करा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रेल्वे गाड्यांचे जनरल तिकीट सेवा बंद करण्यात आलेली होती. त्यावेळी सर्वसाधारण डब्यातून प्रवास बंद होता. त्यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. मात्र अडीच वर्षानंतर आता रेल्वेने जनरल तिकीट सेवा सुरु केल्याने सर्वसाधारण डब्यातून प्रवास करता येणार आहे.
रेल्वेच्या या निर्णयाचा प्रवाशांसोबतच रेल्वेलाही फायदा होत आहे. आता प्रवाशांना पूर्वीप्रमाणे स्थानकात जाऊन खिडकीतून जनरल तिकीट घेऊन प्रवास करता येणार आहे. जनरल तिकीट खरेदी करण्यासाठी तुम्ही रेल्वे स्टेशनवर जाऊन तिकीट खिडकी किंवा व्हेंडिंग मशीनमधून जनरल तिकीट घेऊ शकता. याशिवाय तुम्ही IRCTC च्या UTS मोबाईल अॅपवरून ट्रेनची तिकिटे देखील खरेदी करू शकता.
तसेच ज्या ट्रेनमध्ये तुम्हाला प्रवास करायचा आहे त्या ट्रेनचे नाव सांगूनच तिकीट खरेदी करा. कारण जर तुम्ही पॅसेंजर ट्रेन, एक्सप्रेस ट्रेन किंवा मेल ट्रेनचे तिकीट घेतले असेल आणि तुम्ही सुपरफास्ट ट्रेनमध्ये प्रवास करत असाल तर तुम्हाला त्रासाला सामोरे जावे लागेल आणि तुम्हाला दंडही होऊ शकतो.