⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | Big Breaking : शिवसेनेचे विधीमंडळ कार्यालय सील, शिवसेना-शिंदे गट वाद चिघळणार!

Big Breaking : शिवसेनेचे विधीमंडळ कार्यालय सील, शिवसेना-शिंदे गट वाद चिघळणार!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२२ । राज्यात शिवसेना विरुद्ध शिंदे सेना आणि भाजप वाद अद्याप सुटलेलं नसताना आज सकाळी शिवसेनेचे विधिमंडळ कार्यालय सील केलेले असल्याचे समोर आले आहे. आज होणाऱ्या विधानसभा अध्यक्ष निवडीच्या अधिवेशनापूर्वी हा प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली असून कार्यालयातील कर्मचारी देखील अदयाप कार्यालयाच्या बाहेरच आहे. शिवसेनेकडूनच हे कार्यालय सील करण्यात आल्याची माहिती अद्याप समोर येत आहे. दरम्यान, कार्यालय सील केले तरी काही फरक पडत नाही अशी प्रतिक्रिया आ.गिरीश महाजन यांनी दिली आहे.

शिवसेनेचे कार्यालय सील झाल्याने शिवसेना विरुद्व शिंदे सेना वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अगोदरच विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी बजावण्यात आलेला व्हीप कुणाचा पाळावा यावरून तर्कवितर्क लढविले जात असून त्यात आता हि भर पडली आहे.

सदर बातमी आताच समोर आली असून आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहचविण्यासाठी आम्ही माहिती दिली आहे. हि बातमी आम्ही पुन्हा अपडेट करणार असून अधिक माहितीसाठी बातमीची JalgaonLive.News लिंक पुन्हा रिफ्रेश करा.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.