⁠ 
मंगळवार, नोव्हेंबर 26, 2024
Home | महाराष्ट्र | शिवसेनेच्या सुनील प्रभूंकडून व्हीप जारी, बंडखोर पाळणार कि टाळणार?

शिवसेनेच्या सुनील प्रभूंकडून व्हीप जारी, बंडखोर पाळणार कि टाळणार?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२२ । विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन (Assembly Speaker Election) शिवसेनेतील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले असून याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू (Sunil Prabhu) यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना यासंबंधीचा व्हीप जारी केला आहे.

शिवसेनेचे विधानसभा अध्यक्षपदासाठीचे उमेदवार राजन साळवी यांनाच मतदान करण्याचे आदेश प्रभू यांनी दिले आहेत. आता बंडखोर एकनाथ शिंदे गटातील आमदार हा व्हीप मानणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

रविवारी विधानसभा अध्यक्षपदासाठीची निवडणूक होणार आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दोन्ही बाजूने उमेदवार उभे करण्यात आले आहे. भाजपकडून मुंबईतील कुलाब्याचे आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे कोकणातील आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुख्य शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी शिवसेना आमदार राजन साळवी यांना मतदान करण्याबाबतचा देखील व्हीप लागू केला आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या बंडखोर आमदारांपुढे पेच वाढण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या सुनील प्रभूंचा व्हिप ऐकला नाही तर बंडखोर आमदारांविरोधात पक्षाकडून अधिकृतपणे कदाचित कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. तर दुसरीकडे भाजपसोबत सत्तेत असल्याने भाजप उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान करणं शिंदे गटासाठी अनिवार्य असणार आहे. विशेष म्हणजे ही निवडणूक आवाजी मतदान पद्धतीने होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण कुणाला मतदान करतं हे उघडपणे स्पष्ट होणार आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.