महागड्या पेट्रोल-डिझेलचे टेंशन सोडा ! ‘ही’ आहे स्वस्त आणि जास्त मायलेज देणारी कार
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२२ । सध्या पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले असून यामुळे वाहन चालविणे जिकरीचे झाले आहे. त्यामुळे अनेक जण परवडणाऱ्या आणि जास्त मायलेज देणाऱ्या गाड्या खरेदी करताना दिसून येतंय. अशात तुम्ही जर स्वस्त चांगली मायलेज देणाऱ्या कारच्या शोधात असाल तर तुम्ही मारुती सुझुकीची कार खरेही करू शकतात. मारुती सुझुकी सेलेरियो असे या कारचे नाव आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, कंपनीने नेक्स्ट जनरेशन सेलेरिओ लाँच केले होते, जी सीएनजी प्रकारात अल्टो (सीएनजी) पेक्षा जास्त मायलेज देते.
मारुती सेलेरियो प्रकार आणि किंमत
मारुती सुझुकी सेलेरियोचे 8 प्रकार बाजारात आहेत. त्याची किंमत सुमारे 5.25 लाख रुपये ते सुमारे 7 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. त्याचे बेस व्हेरिएंट LXI 1L ISS 5MT आहे, ज्याची किंमत 525000 रुपये आहे आणि त्याचा टॉप व्हेरिएंट ZXI+ 1L ISS AGS आहे, ज्याची किंमत 7 लाख रुपये आहे. त्याच्या VXI CNG 1L 5MT व्हेरियंटची किंमत 6.69 लाख रुपये आहे.
मारुती सेलेरियोचे मायलेज
मारुती सुझुकी सेलेरियो पेट्रोलचे मायलेज 26.68 किमी आहे. त्याच वेळी, त्याच्या CNG प्रकाराचे मायलेज (VXI CNG 1L 5MT) 35.60 km/kg आहे तर मारुती सुझुकीच्या नवीन Alto S-CNG चे सरासरी मायलेज 31.59 km/kg आहे. म्हणजेच मारुती सुझुकी सेलेरियो सीएनजी व्हेरियंटचे मायलेज अधिक आहे.
मारुती सेलेरियोचे इंजिन आणि तपशील
नवीन मारुती सेलेरियो नवीन K10C DualJet 1.0-लीटर तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिनसह येते, जे 66 hp पॉवर आणि 89 Nm टॉर्क जनरेट करू शकते. हे स्टार्ट/स्टॉप सिस्टमसह येते. यात 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT गिअरबॉक्सचा पर्याय आहे.