⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | महाराष्ट्र | ..आता शिवसेना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात, जिल्हाप्रमुखांसह नगरसेवकांच्या बैठका बोलावल्या

..आता शिवसेना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात, जिल्हाप्रमुखांसह नगरसेवकांच्या बैठका बोलावल्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२२ । राज्यातील राजकारणातील संकटाचे किस्से देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय राहिले आहेत. शिवसेनचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना संपूर्ण हादरून गेली आहे. शिंदे गटात शिवसेनेचे जवळपास ४० हुन अधिक आमदार असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. दरम्यान, अशातच पक्षाची अधिक पडझड होऊ नये, म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी हालचाली सुरु केल्या असून त्यांनी आज मुंबई महापालिकेतील नगरसेवक आणि जिल्हाप्रमुख तसेच जिल्हा संपर्क प्रमुखांच्या बैठका बोलावल्या आहेत. त्यामुळे या बैठकीत काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शिंदे यांनी 50 हून अधिक आमदारांना घेऊन आसाम गाठलं आहे. त्यानंतर आमचीच शिवसेना (shivsena) खरी असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. शिंदे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी आता शिवसेनेच्या चिन्हावरच हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवसेनेचं राज्यातील अस्तित्वच धोक्यात आलं आहे. या शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख म्हणूनही कस लागणार आहे.

दरम्यान, आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची महत्वाची बैठक आज होणार आहे. आज दुपारी 12 वाजता शिवसेना भवनात ही बैठक होणार आहे. उद्धव ठाकरे हे साडे अकराच्या सुमारास ही बैठक होणार आहे. तर उद्धव ठाकरे हे मुंबई महापालिकेतील नगरसेवकांशी संध्याकाळी संवाद साधणार आहेत.

महापालिकेतील किती नगरसेवक ठाकरेंसोबत?
मुंबई महापालिकेतील काही नगरसेवकही शिंदे यांच्या गळाला लागल्याचं सांगितलं जात आहे. आमदार यामिनी जाधव या शिंदे यांच्या गटात सामिल झाल्या आहेत. यामिनी जाधव या माजी नगरसेविका आहेत. त्यांचे पती यशवंत जाधव हे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आहेत. त्यामुळे जाधव यांच्याकडून शिवसेनेचे नगरसेवक फोडले जाऊ नयेत म्हणूनही ठाकरेंकडून खबरदारी घेतली जात आहे. मात्र, मुंबईतले फारसे नगरसेवक शिंदेंच्या गटात सामिल होणार नसल्याचं सांगितलं जात आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.