⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | हवामान | जळगाव जिल्ह्यात साेमवारपर्यंत पूर्वमाेसमी पावसाची शक्यता, तापमान चाळीशीखाली

जळगाव जिल्ह्यात साेमवारपर्यंत पूर्वमाेसमी पावसाची शक्यता, तापमान चाळीशीखाली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२२ । राज्यातील अनेक भागात पूर्वमोसमी पाऊस कोसळत आहे. जळगाव जिल्ह्यात देखील येत्या साेमवारपर्यंत पूर्वमाेसमी पावसाच्या सरी काेसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा देखील चाळीशीखाली आला आहे.

गेल्या महिन्यात जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा ४५ ते ४६ अंशावर गेल्याने प्रचंड उकाडा जाणवत होता. मात्र काही दिवसापासून ढगाळ वातावरण आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तापमानाचा पारा ४० वर आला आहे. परंतु गेल्या आठ्वड्यात तापमानात वाढ होऊन उष्णता जाणवत होती. मात्र तीन ते चार दिवसापासून जिल्हयात ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा पुन्हा चाळीशीवर आला आहे. गुरुवारी जिल्ह्यात ४० अंश तापमान नाेंदवले गेले आहे.जिल्ह्यात येत्या साेमवारपर्यंत पूर्वमाेसमी पावसाच्या सरी काेसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अडकलेली मान्सूनची गाडी रूळावर आली असून मान्सूननं हळूहळू पुढे सरकण्यास सुरुवात केली आहे. काही तासांतच मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. त्यासोबतच राज्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. काल (गुरुवारी) राज्यातील अनेक भागांत पावसानं (Rain Updates) दमदार हजेरी लावली. मुंबईसह (Mumbai) उपनगरांत पावसाच्या सरी कोसळताना दिसल्या. तसेच, राज्यातील काही जिल्ह्यातही पावसाची हजेरी दिसून आली.

जळगावातील आजचे दिवसभरातील तापमान (Jalgaon Temperature) असे?

वेळ – अंश
११ वाजेला –३६ अंश
१२ वाजेला – ३७अंश
१ वाजेला- ३८ अंशापुढे
२ वाजेला – ३९ अंश
३ वाजेला – ३९ अंशापुढे
४ वाजेला – ३९ अंश
५ वाजेला – ३८ अंश
६ वाजेला – ३६ अंश
७ वाजेला – ३४ अंश
आणि रात्री ८ वाजेला ३३ तर रात्री ९ वाजेला ३२ अंशावर स्थिरावणार.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.