⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | शैक्षणिक | धकधक वाढली : उद्या जाहीर होणार १२ वीचा निकाल, वाचा कुठे कळणार निकाल

धकधक वाढली : उद्या जाहीर होणार १२ वीचा निकाल, वाचा कुठे कळणार निकाल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जून २०२२ । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकाल (HSC Results 2022) बाबत मोठी बातमी समोर आलीय. ती म्हणजे बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (8 जून, दुपारी 4 वाजता) लागणार आहे. यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलीय.

दरम्यान, 2 वर्ष कोरोना महामारी, दोन्ही वर्ष दहावी आणि बारावी दोन्हीच्या परीक्षाही ऑनलाईन आणि निकालही ऑनलाईन. यावेळी मात्र दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आला. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हत्या. पण यंदा मात्र कोरोना आटोक्यात असल्यानं दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. आता मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतिक्षा होती.

दरम्यान निकालाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी आधीच दिली होती. निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलं. राज्यातील बारावीच्या सर्व विद्यार्थी पालकांचं हे बारावीच्या निकालाच्या लक्ष लागलेलं होतं. विद्यार्थ्यांची (HSC result News) धाकधूकही वाढली होती. अखेर बुधवारी दुपारी हा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे लवकरच दहावीच्या निकालाची तारीखही जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. 

बारावी बोर्डाच्या परीक्षा 4 मार्चपासून सुरु झाल्या आणि 7 एप्रिल रोजी संपल्या होत्या. तर राज्यातील 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. अखेर या सर्वांची प्रतीक्षा संपली असून उद्या निकाल जाहीर केला जाणार आहे.

अशा प्रकारे चेक करता येणार निकाल
1. विद्यार्थ्यांनी प्रथम महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत वेबसाइट www.mahahsscboard.in भेट द्यावी.
2. यानंतर होम पेजवर दिलेल्या “इयत्ता 12वी निकाल 2022” या लिंकवर क्लिक करा.
3. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, इथे तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख टाकून सबमिट करा.
4. यानंतर तुमचा 12वी निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.