जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२२ । मान्सूनच्या आगमनापूर्वीच राज्यातील अनेक भागात पूर्वमाेसमी पावसाचे संकेत असलेल्या क्युमुलस या प्रकारच्या ढगांनी गर्दी केली आहे. यामुळे तापमानाचा पारा किंचित घसरला आहे. जळगावात पारा ४१ अंशांवर तर रात्रीचे किमान तापमानदेखील २६ अंशांपर्यंत खाली आला आहे. काही दिवसापूर्वी सकाळी १० वाजेपर्यंत ४० अंशावर जाणारे तापमान आता ३५ अंशावर आल्याने उकाड्यापासून दिलासा मिळत आहे. आज मंगळवारी दुपारी १२ वाजेला उन्हाचा पारा ३६ अंशावर असल्याचे दिसतेय.
अंदमानात दाखल झालेला मान्सून येत्या रविवारपर्यंत केरळात दाखल हाेण्याची शक्यता आहे. दरवर्षीच्या १ जून या निर्धारित वेळेपूर्वीच म्हणजेच २९ ते ३० मे दरम्यान मान्सून केरळात दाखल हाेण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या आगमनापूर्वीच उत्तर महाराष्ट्रासह मुंबई, काेकण, गाेवा, विदर्भवर पूर्वमाेसमी पावसाचे संकेत असलेल्या क्युमुलस या प्रकारच्या ढगांनी गर्दी केली आहे. यामुळे पारा घसरला आहे.
मागील गेल्या काही दिवसापूर्वी राज्यातील बहुतांश ठिकाणचा पारा ४२ ते ४४ तर काही ठिकाणी तब्बल ४५ ते ४७ अंशापर्यंत गेला होता. यामुळे उष्णतेच्या लाटेने अंगाची लाहीलाही झाली होती. मात्र मान्सूनपूर्व पावसाने राज्यातील अनेक ठिकाणी हजेरी लावली तर काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे राज्यात कमाल तापमानात घसरण झाली आहे.
जळगावात (Jalgaon) देखील तापमानात (temperature) घट झाली असून यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळत आहे. आज सकाळी १० वाजेपर्यंत उन्हाचा पारा ३५ अंशावर असल्याचे दिसून येत असून तो दुपारी ४ वाजेपर्यंत ४० अंशावर जाईल.
जळगावातील आजचे दिवसभरातील तापमान (Jalgaon Temperature) असे?
वेळ – अंश
११ वाजेला – ३५ अंश
१२ वाजेला – ३६ अंश
१ वाजेला- ३७ अंशापुढे
२ वाजेला – ३८ अंश
३ वाजेला – ३९ अंशापुढे
४ वाजेला – ४० अंश
५ वाजेला – ३९ अंश
६ वाजेला – ३९ अंश
७ वाजेला – ३८ अंश
आणि रात्री ८ वाजेला ३६ तर रात्री ९ वाजेला ३४ अंशावर स्थिरावणार.