⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

मोठी बातमी ! पुणे रेल्वे स्थानकात बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आल्याने खळबळ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२२ । पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आलीय. ती म्हणजे पुणे रेल्वे स्थानकात (Pune Railway Station) बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे स्थानक परिसरात बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, डॉग स्कॉड सुद्धा दाखल झाले आहेत. सध्या पुणे रेल्वे स्थानक (Pune Railway station) रिकामे करण्यात आले होते तसेच पुण्याकडे येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या थांबण्यात आल्या.

स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी परिसरात वस्तू सापडल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहोचले आहे. पुणे रेल्वे स्थानकात बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण रेल्वे स्थानक रिकाम करण्यात आलं आहे. त्यानंतर पुणे रेल्वे स्थानकाची कसून तपासणी करण्यात आली.

वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा रेल्वे स्थानकात दाखल झाले असून त्यांच्या देखरेखीखाली शोध मोहीम सुरु होती. रेल्वे स्थानकावर आढळून आलेले स्फोटकसदृश वस्तू या प्रथमदर्शनी तरी जिलेटीन असल्याचे वाटत नाही. पण बॉम्बशोधक पथकाकडून या वस्तूंची तपासणी सुरु होते. या घटनेनंतर पुणे पोलीस स्थानकाच्या परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.