⁠ 
सोमवार, जानेवारी 6, 2025
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | अल्पवयीन मुलीस पळवून नेत अत्याचार, पोलिसांनी संशयिताचे आवळल्या मुसक्या

अल्पवयीन मुलीस पळवून नेत अत्याचार, पोलिसांनी संशयिताचे आवळल्या मुसक्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२२ । जळगाव शहरातील एका अल्पवयीन मुलीस पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी एका संशयितास डोंबिवलीतून अटक केली.

सचिन गुरुदास पाटील (वय २१, रा. सम्राट कॉलनी) असे पाेलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. सचिन पाटील याने एका अल्पवयीन मुलीस काहीतरी फूस लावून पळवून नेले होते. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिनविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल होता. सचिन पाटील हा डोंबिवलीत राहत असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली.

त्यांनी तत्काळ सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, विकास सातदिवे, सपना ऐगुंटल्ला यांचे पथक तयार करून रवाना केले. पथकाने १० मे रोजी सचिनला डोंबिवली भागातून सकाळी सहा वाजता ताब्यात घेलते. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सचिनच्या विरुद्ध अत्याचाराच्या गुन्ह्याचे कलम वाढवण्यात आले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.