⁠ 
सोमवार, जानेवारी 13, 2025
Home | राजकारण | आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेच्या पंतप्रधानांचा राजीनामा !

आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेच्या पंतप्रधानांचा राजीनामा !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज । ९ मे २०२२ । श्रीलंकेतील माहागाई हाताबाहेर गेली आहे. श्रीलंकनं अर्थव्यवस्था (Shri Lanka Economic Crisis) डबघाईला आल्यानंतर देशभरात राजपक्षे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत होतं. दरम्यान, प्रचंड विरोधानंतर श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजपक्षे यांच्या समर्थकांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलकांवर हल्ला केल्यानंतर राजधानी कोलंबोमध्ये लष्कर तैनात करण्यात आले आहे.

आंदोलकांशी समर्थकांची हाणामारी
राजपक्षे समर्थकांनी आंदोलकांवर केलेल्या हल्ल्यात 78 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी देशभर संचारबंदी लागू केली आणि इतर दोन कॅबिनेट मंत्र्यांनीही राजीनामे जाहीर केले.

राजपक्षे यांचे नेते आणि त्यांच्या समर्थकांवर शांततेने आंदोलन करणाऱ्या लोकांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. कोलंबोमधील पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या टेम्पल ट्रीज येथे जमलेल्या राजपक्षे समर्थकांनी महिंदा राजपक्षे यांना त्यांच्या पदावर कायम राहण्याचे आवाहन केले होते परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. दरम्यान, राष्ट्रपतींनी हिंसाचाराच्या घटनांचा निषेध केला आहे.

पंतप्रधान महिंदा यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्याकडे पाठवला आहे. 1948 मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून श्रीलंका आजवरच्या सर्वात गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. मुख्यतः परकीय चलनाच्या कमतरतेमुळे हे संकट उद्भवले याचा अर्थ देश मुख्य अन्नपदार्थ आणि इंधनाच्या आयातीसाठी पैसे देऊ शकत नाही.

आर्थिक परिस्थिती बिघडत आहे
9 एप्रिलपासून, हजारो आंदोलक श्रीलंकेत रस्त्यावर उतरले आहेत, कारण सरकारकडे आयातीसाठी निधी संपला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यासोबतच मूलभूत गोष्टींचाही अभाव दिसून येत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.