जळगाव लाईव्ह न्युज | ५ मे २०२२ | महाराष्ट्र हा शाहु-फुले-आंबेडकर यांच्या विचारावर चालणारी राज्य आहे या महाराष्ट्रात कुणीही अल्टीमेटम ची भाषा करू नये कारण उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या प्रशासनात कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही अशा भाषेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोणत्याही धार्मिक स्थळावर जर भोंगे लावायचे असतील तर त्यासाठी परवानगी घेणे अतिशय गरजेचे आहे. परवानगीशिवाय कोणत्याही धार्मिक स्थळावर भोंगळे लावले तर त्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे आम्ही वेळोवेळी यासाठी परवानगी घ्यावी असे आवाहन करूनही काहीजण या आव्हानाला प्रतिसाद देत नाहीये अशांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
पुढे बोलताना पवार म्हणाले की, धार्मिक स्थळावर विनापरवानगी भोंगे लावल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल ही जशी बाब खरी आहे. दुसरी बाब म्हणजे कोठेही कायदा हातात घेण्याची गरज नाही जो कायदा हातात घेईल त्याच्यावर देखील कडक कारवाई करण्यात येईल.