जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२२। श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांत गुरुवारी गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या आज्ञेनुसार श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्ताने अखंड नाम जप यज्ञ सप्ताह व गुरू चरित्र वाचन सप्ताहाची नुकतीच सांगता करण्यात आली.
श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्ताने शहरातील प्रतापनगरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुवारी सकाळी स्वामी महाराजांच्या मूर्तीवर षोडशोपचार पूजन करून अभिषेक करण्यात आला. सकाळी सप्ताहानिमित्ताने यज्ञाची पूर्णाहुती करण्यात आली. या सप्ताहाचे यजमान हेमंत व मेघमाला वाकचौरे यांनी सात दिवस पूजा, हवन केले. तर महानैवेद्य आरती मुकुंदा बऱ्हाटे, अतिरिक्त आयुक्त विशाल मकवाने यांनी केल्याचे विजय निकम यानी सांगितले.