जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२२ । उन्हाळ्यात बिअर कंपन्यांची विक्री आणि कमाई वाढते. उष्णतेपासून वाचण्यासाठी लोक थंडगार बिअरचाही अवलंब करतात. मात्र, यंदा असे करणे महागात पडणार आहे. तापमानाचा पारा शिगेला पोहोचलेला असताना आता लवकरच बीयर कंपन्या आपल्या बीयरचे दर वाढवणार (Beer Price Hike) आहेत. विविध कंपन्यांच्या बीयरच्या (Beer) दरात 10 ते 15 टक्क्यांची वाढ होऊ शकते, तसे संकेत कंपन्यांच्या वतीने देण्यात आले आहेत. बार्लीसह इतर कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने हे पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे.
उन्हाळ्यात बीयरची सर्वाधिक विक्री होते. मार्च ते जूनदरम्यान 40 ते 50 टक्के बीयरच्या साठ्याची विक्री होतो. मात्र यंदा उन्हाळा सुरू होऊन बीयर विक्रीचा हंगाम सुरू झाला तरी देखील बीयर उद्योजग म्हणावे तसे आनंदीत दिसत नाहीयेत. यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध (Ukraine Crisis) हे आहे. बीयरच्या निर्मितीसाठी गव्हाची मोठ्याप्रमाणात आवश्यकता असते, युक्रेन आणि रशिया हे दोनही देश गव्हाची सर्वाधिक निर्यात करणाऱ्या देशांपैकी एक आहेत. मात्र युद्ध सुरू असल्यामुळे निर्यातीवर बंधने आली आहेत, निर्यात ठप्प असल्याने त्याचा परिणाम हा बीयर उद्योगावर झाला आहे.
भारतात, राज्य सरकारे किंमत ठरवतात
भारतातील दारूची किंमत राज्य सरकारे ठरवतात. तेलंगणा आणि हरियाणासारख्या राज्यांनी यापूर्वीच बिअरच्या किमती वाढवल्या आहेत. दारूविक्रेत्यांच्या मागणीनुसार इतर राज्येही असेच करणार आहेत. ब्रूअर्सचे म्हणणे आहे की रशिया आणि युक्रेनमधील अनेक महिने चाललेल्या युद्धामुळे एका वर्षापूर्वीच्या तुलनेत बार्लीच्या किंमतीत 65 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय पॅकेजिंग आणि वाहतुकीचा खर्चही वाढला आहे. या कारणांमुळे बिअरच्या किमती वाढवायला हव्यात.
या बिअर कंपन्यांच्या समस्या आहेत
ET च्या अहवालात, Budweiser आणि Hoegaarden बिअर निर्माता AB InBev चे म्हणणे उद्धृत केले गेले आहे की अल्कोहोल निर्माते किंमत वाढवण्यासाठी सरकारकडून मंजुरी घेत आहेत. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही कमोडिटीज आणि नॉन-कमोडिटीजच्या किमती सध्यातरी कमी होणार नाहीत अशी अपेक्षा करतो. जागतिक पुरवठा साखळीतील समस्यांमुळे दर महिन्याला त्यांच्या किमती वाढत आहेत. जवासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. पॅकेजिंग साहित्यही महाग झाले आहे.
हे देश बार्ली आणि गव्हाचे सर्वात मोठे निर्यातदार आहेत
खरेतर, रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश गहू, बार्ली या पिकांचे सर्वात मोठे उत्पादक आणि निर्यातदार आहेत. रशिया हा जगातील सर्वात मोठा गव्हाचा निर्यातदार देश आहे, तर युक्रेन चौथ्या स्थानावर आहे. गव्हाच्या एकूण जागतिक निर्यातीपैकी 25 टक्के वाटा या दोन्ही देशांचा मिळून आहे. त्याचप्रमाणे, बार्लीच्या बाबतीत, दोन्ही देशांचा समावेश टॉप 5 निर्यातदारांमध्ये आहे. बिअर बनवण्यासाठी बार्लीचा सर्वाधिक वापर केला जातो. यानंतर बिअर बनवण्यासाठी गव्हाचाही योग्य वापर केला जातो. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे बार्ली आणि गव्हाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे.
या महिन्यांत बिअरची अधिक विक्री होते
भारतात मार्च ते जुलै या कालावधीत 40 ते 45 टक्के बिअरची विक्री होते. बीअर कंपन्यांनी असा अंदाज व्यक्त केला होता की, सलग दोन खराब हंगामानंतर त्यांची विक्री या वर्षी वार्षिक आधारावर 40 टक्क्यांनी वाढू शकते. कोरोना महामारीशी संबंधित निर्बंधांमुळे गेल्या दोन उन्हाळ्यात रेस्टॉरंट्स, बार आणि क्लब इत्यादी बंद राहिले. येथे सर्वाधिक बिअर विक्री होते. 2020 मध्ये देशभरात लॉकडाऊन लागू असताना अनेक दारूविक्रेत्यांना हजारो लीटर बिअर नाल्यात टाकावी लागली.