⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

पैसे द्यायला सासूने दिला नकार, मग जावयाने केले असे काही की खावी लागेल जेलची हवा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज। २७ एप्रिल २०२२ । नशिराबाद येथील मन्यारखेडा येथे चक्क पैसे दिले नाही म्हणून सासूला जावयाने शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, नशिराबाद गावाजवळ असलेल्या मन्यारखेडा गावात बालीबाई भारमल राठोड (वय-४२) या वास्तव्यास आहेत त्यांची मुलगी ही जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीत संतोष बबलू पवार यांना दिली आहे. दि २६ एप्रिल रोजी सकाळी ५.३० वाजता जवाई संतोष पवार हा सासुबाई राठोड यांच्याकडे पैसे मागण्यासाठी आला होता. त्यावेळी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून संतोष पवार याने शिवीगाळ करून काठीने सासूला मारहाण करून पळून गेला. बालीबाई राठोड या जखमी अवस्थेत नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रारीवरून जावई संतोष पवार यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक फौजदार रवींद्र तायडे हे करीत आहेत.