जळगाव लाईव्ह न्यूज | २३ एप्रिल २०२२ । येथील केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात आज जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
पुस्तके माणसाला घडवतात. संस्कार करतात. पुस्तक बाहेरून कसे आहे. त्यापेक्षा त्यातील मजकूर किती जीवनदायी आहे हे महत्वाचे असते. पुस्तकांना आपण आपले मित्र माना आणि उन्हाळी सुटी आपल्या या मित्रांच्या संगतीत घालवा, असे मुख्याध्यापक रेखा पाटील यांनी मुलांना सांगितले तसेच शाळेचे शिक्षण समन्वयक चद्रकांत भंडारी यांनी इसापच्या जगभरात प्रसिद्ध असलेल्या तहानलेला कावळा ‘ कोल्याला द्राक्षे आंबट, ससा व कासव, लांडगा आला रे आला व सोन्याचे अंडे देणारी कोंबडी या कथांविषयी माहिती सांगितली. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.