⁠ 
सोमवार, जानेवारी 6, 2025
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | लिनेस क्लबतर्फे पाणपोईचे उद्घाटन‎

लिनेस क्लबतर्फे पाणपोईचे उद्घाटन‎

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२ । ‎येथील लिनेस क्लब जळगावतर्फे‎ शहरात दोन ठिकाणी नुकतीच पाणपोई सुरू‎ करण्यात आली.

नयनतारा गेस्ट‎ हाऊससमोरील पाणपोईचे उद्घाटन‎ नीलिमा सेठिया यांच्याहस्ते करण्यात‎ आले. तर रायसोनी सायकल मार्ट‎ जवळील पाणपोईचे उद्घाटन‎ उज्ज्वल रायसोनी व किरण गांधी‎ यांच्या हस्ते करण्यात आले. यासाठी‎ पल्लवी लोढा यांची मदत लाभली,‎ क्लबतर्फे सिंधी कॉलनीत रस्त्यावर‎ भाजी विक्री करणाऱ्या महिलांना‎ छत्रींचे वाटप करण्यात आले.‎ कल्पना काबरा यांनी यासाठी सहकार्य केले.‎ यावेळी क्लबच्या अध्यक्षा दर्शना ललवाणी,‎ शैला छोरिया, विजू बाफना,‎ उज्ज्वल मुथा, सपना छोरीया,‎ अलका कांकरिया, प्रिया दारा‎ उपस्थित होत्या.‎

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.