जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । केंद्राने २४०० कोटींचा निधी दिला आणखी घोषणा करणार आहेत. २०१४ ला जन्म घेतलेला विकास आज आपल्यासमोर विकासपुरुष म्हणून दिसतो. आज मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे दळणवळण वाढले. बांभोरी ते नशिराबाद दरम्यान उड्डाणपूल व्हावा. वाहतुकीचा मोठा प्रश्न सुटेल. महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामासाठी केंद्रामार्फत निधी मिळावा, अशी विनंती आ.सुरेश भोळे यांनी केली.
केंद्रीय रस्ते व वाहतूक आणि दळणवळण मंत्री ना.नितीन गडकरी हे आज जिल्ह्यात आले आहेत. जिल्ह्यातील २३९० कोटींच्या ७ महामार्ग प्रकल्पांचे त्यांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार असून ७० कोटींच्या ९ प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले. शिवतीर्थ मैदानावर हा सोहळा पार पडला. या प्रसंगी आ.राजू मामा भोळे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर ना.नितीन गडकरी, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खा.रक्षा खडसे, खा,उन्मेष पाटील, आ.गिरीश महाजन, संजय सावकारे, आ.लताताई सोनावणे, महापौर जयश्री महाजन, मंगेश चव्हाण, स्मिता वाघ यांसह मान्यवरांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आ.भोळे म्हणाले कि, शेतकऱ्यांचे प्रश्न तांत्रिक बाबीमुळे रखडले आहे ते पूर्ण करावे. जेष्ठ नागरिकांनी ओळखपत्र दाखविले तर टोल फ्री करावा, विकासपुरुष नितीन गडकरी येताय म्हणजे जिल्ह्यात दिवाळीचे वातावरण होते. प्रत्येकाच्या मनावर एक प्रसन्नित चित्र होते. पावणे दोन वर्षात वरखेडे लोंढे प्रकल्पाला निधी मिळाला, शेळगाव बॅरेज प्रकल्प आपल्यामुळे पूर्ण झाला. नवीन तंत्रज्ञान, विज्ञान घेऊन गडकरी साहेब आपल्याला विकासाकडे घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई-नागपूरला जोडणारा समृद्धी मार्ग झाला. देश आंतरराष्ट्रीय महामार्गांनी जोडला गेला परंतु जळगावचा त्यात समावेश नाही. त्यामुळे आम्ही विकासापासून लांब राहतो की काय अशी भिती होती असती त्यानी सांगितले.