जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । केंद्रीय रस्ते वाहतूक आणि दळणवळण मंत्री ना. नितीन गडकरी हे आज दि २२ एप्रिल रोजी महामार्गांच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी शहरात दाखल झाले आहेत.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि दळणवळण मंत्री ना. नितीन गडकरी हे जळगाव जिल्हा दौर्यावर असून आहेत. त्यांच्या उपस्थितीत हॉटेल प्रेसिडेंट कॉटेजमध्ये भाजपच्या मेळाव्याचे आयोजन देखील करण्यात आले आहे. यानंतर शिवतीर्थ मैदानावर त्यांच्या हस्ते जळगाव जिल्ह्यातील विविध महामार्गांच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज दुपारी चारच्या सुमारास ना. नितीन गडकरी हे धुळे येथून जळगाव शहरात विमानाने दाखल झाले असून ते पहिल्यांदा हॉटेल प्रेसिडेंट कॉटेजमध्ये आले आहेत.