⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

अवजड वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | २१ एप्रिल २०२२ । येथील नशिराबाद मार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक केल्याने दोन जण ठार झाल्याची घटना उघडकीस अली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, येथील राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने धावणार्‍या अवजड वाहनाने दुचाकीला उडविल्याने यावरील दोन्ही जण ठार झाले. माऊली पेट्रोल पंपाजवळ काल सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एमएच ०६ बीई १७६९ या वाहनाने एमएच १९ एएक्स २४६० या क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. यात भूषण रमेश पाटील ( वय ४२, रा. फैजपूर, ता. यावल) हे जागीच ठार झाले. तर गंभीर जखमी झालेले संजय मधुकर भिरूड ( वय ४५, रा. मस्कावद, ता. रावेर) यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

या अपघातात मयत झालेले दोघे जण आरोग्य सेवक म्हणून कार्यरत होते. जळगाव येथील काम आटोपून घरी जात असतांनाच त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.