⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | Jalgaon Temperature Update : आज जिल्ह्यात अवकाळीची शक्यता, वाचा आजचे तापमान कसे राहणार?

Jalgaon Temperature Update : आज जिल्ह्यात अवकाळीची शक्यता, वाचा आजचे तापमान कसे राहणार?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२२ । राज्यावर अवकाळीचे सावट असले तरी उन्हाचा तडाखा कायम दिसून आला. काल बुधवारी जळगाव जिल्ह्यातील तापमान ४३ ते ४४ अंशावर होते. काल भुसावळचे कमाल तापमान ४४.२ तर जळगावचे ४३.५ अंश नोंदवण्यात आले आहे. दरम्यान, हवामान विभागाने संपूर्ण राज्यात २४ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे आज सकाळपासून जिल्ह्यात ढग दाटून आले असून यामुळे जिल्ह्याचा आज उन्हाचा पारामध्ये ३ ते ४ अंशाने घसरण दिसून येणार.

यंदा मार्च महिन्याच्या मध्यंतरीपासूनच जळगाव जिल्ह्याचा तापमानाचा पारा ४० अंशावर गेला होता. जिल्ह्यात ६ एप्रिल रोजी यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४४.८ तापमान नोंदवले गेले. भुसावळातील केंद्रीय जलआयोगाच्या कार्यालयात ही नोंद झाली होती. यानंतर सलग चार दिवस जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला. नंतरदेखील पारा सलग ४१ ते ४२ अंशांपेक्षा जास्त राहिला.

काल बुधवारी वातावरण ४८ टक्के ढगाळ हाेते. सूर्याचा यूव्ही इंडेक्स १२च्या उच्चांकी पातळीवर असल्याने उष्णतेची तीव्रता प्रखर जाणवत हाेती. वाऱ्याचा वेगही ताशी १७ किमीपर्यंत हाेता तर आर्द्रता ९ टक्क्यावर हाेती. ढगाळ वातावरण उष्णतेचा उकाडा वाढवणारे ठरले. आजपासून पुढील दोन दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आज सकाळपासून जिल्ह्यात ढग दाटून आले आहे. यामुळे उन्हाचा पाऱ्यामध्ये घट होईल. तर हलका ते मध्यम स्वरुपाच्या पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे.

आज गुरुवारी सकाळी १० वाजेपर्यंत उन्हाचा पारा ३५ अंशावर स्थिरावणार आहे.

जळगावातील आजचे दिवसभरातील तापमान (Jalgaon Temperature) असे?
वेळ – अंश
१० वाजेला – ३५ अंश
११वाजेला – ३७ अंश
१२ वाजेला – ३८ अंश
१ वाजेला- ३९ अंशापुढे
२ वाजेला – ३९ अंश
३ वाजेला – ३९ अंश
४ वाजेला – ३९ अंश
५ वाजेला – ३८ अंश
६ वाजेला – ३७ अंश
७ वाजेला – ३४ अंश
आणि रात्री ८ वाजेला ३३ अंशावर स्थिरावणार.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.