जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२२ । यंदा मार्च महिन्यापासूनच राज्यातील पारा ४० अंशावर गेला होता. जळगाव जिल्ह्यातील पारा देखील कमालीचा वाढलेला होता. गेल्या महिन्यात ४० अशांवर असलेला पारा या चालू एप्रिल महिन्यात तो ४२ ते ४३ अंशावर गेला आहे. दरम्यान, काल साेमवारी कमाल तापमान ४२.८ अंशांवर पाेहाेचले हाेते. वाऱ्याचा वेग ताशी ११ ते २२ किमीपर्यंत हाेता. त्यामुळे उष्णतेच्या झळा अधिक तीव्र जाणवत हाेत्या.
दरम्यान, एकीकडे राज्यातील काही भागात उन्हाचा चटका बसत आहे. तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली चक्रावाताची स्थिती राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट घेऊन आले आहे. राज्यात आजपासून पुढील दोन दिवस विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने वर्तविला आहे. ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा पारा घसरू शकतो.
ढगाळ वातावरणामुळे जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसापूर्वी तापमानाचा पारा एक ते दोन अंशाने कमी झाला होता. तर शनिवार जळगावचा पारा ४१.७ अंशांपर्यंत खाली आला होता. तर रविवारी वाढून तो ४२.४ अंशावर पोहोचला होता. व काल साेमवारी कमाल तापमान ४२.८ अंशांवर होता. आज मंगळवारी सकाळी ११ वाजेला तापमानाचा पारा ४० अंशावर होता. तो दुपारच्या वेळेस ४२ ते ४३ अंशापुढे जाण्याची शक्यता आहे.
जळगावातील आजचे दिवसभरातील तापमान (Jalgaon Temperature) असे?
वेळ – अंश
१२ वाजेला – ४० अंश
१ वाजेला – ४२ अंश
२ वाजेला- ४२ अंश
३ वाजेला – ४३ अंशापुढे
४ वाजेला – ४२ अंशापुढे
५ वाजेला – ४१ अंश
६ वाजेला – ३९ अंश
७ वाजेला – ३६ अंश
आणि रात्री ८ वाजेला ३५ अंशावर स्थिरावणार.