जळगाव शहर
लायन्सच्या उपप्रांतपालपदी गिरीश सिसोदिया
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२२ । लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ एच २ चे प्रांतीय अधिवेशन नुकतेच सेल्वासा येथे पार पडले. या अधिवेशनात उपप्रांतपालपदी गिरीश सिसोदिया यांची मतदान प्रक्रियेतून निवड करण्यात आली.
लायन्स क्लब जळगावला तब्बल १८ वर्षांनी या पदाचा बहुमान प्राप्त झाला आहे. यावेळी विवेक अभ्यंकर, माजी राष्ट्रीय डायरेक्टर डाॅ. नवल मालू, उपप्रांतपाल सुनील देसर्डा यांची उपस्थिती होती. सिसाेदिया हे गेल्या अनेक वर्षांपासून लायन्स क्लबचे सदस्य असून त्यांनी विविध पदे भूषविली आहेत.