जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२२ । येथील आसोदा रेल्वगेट ते यावल या राज्यमार्गावरील आसोद्यातील रखडलेल्या पुलाच्या कामास तात्काळ सुरुवात करून निश्चित आराखड्यानुसार काम पूर्ण करण्यात यावे अशा मागणीसाठी आसोदेकेर ग्रामस्थ सोमवार दि १८ रोजी गावातील राज्यमार्गावरील पुलावरच साखळी उपोषणाला बसणार आहेत.
पुलाची रूंदी ही निश्चित आराखड्यानुसार न घेतल्याने या कामावर ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने महिन्याभरापासून हे काम बंद केले आहे. याबाबत ग्रामस्थांनी विभागाकडे वारंवार तक्रार करूनही काम सुरु करण्यात येत नाही, यासह आराखड्याची माहितीही दिली जात नाही. पुलाचे काम ५० टक्यांपेक्षा अधिक झाले आहे. दीड महिन्यापासून कंत्राटदाराने काम बंद केले आहे. परिणामी हजारो वाहनधारकांना गैरसोयीच्या मार्गाने जावे लागत आहे.