⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | आरोग्य | शिंदाड येथे आरोग्य तपासणी शिबीराचा नागरिकांनी घेतला लाभ

शिंदाड येथे आरोग्य तपासणी शिबीराचा नागरिकांनी घेतला लाभ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज। १५ एप्रिल २०२२। पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथे श्री रामनवमी, हनुमान जयंती सप्ताह तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पाचोरा व शिंदाड ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले. या शिबिराचा परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला.

या शिबिरात मधुमेह, हृदयरोग, थायरॉईड, किडनी विकार यासह विविध आजारांची तपासणी करण्यात आली. सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. स्वप्निल पाटील, डॉ. ग्रिष्मा पाटील यांनी परिसरातील सुमारे २७५ रुग्णांची तपासणी केली. सर्वप्रथम शिबिराचे उद्घाटन शिंदाड – पिंपळगाव (हरेश्र्वर) गटाचे माजी जि. प. सदस्य मधुकर काटे, डॉ. स्वप्निल पाटील डॉ. ग्रिष्मा स्वप्निल पाटील, सरपंच ज्ञानेश्वर तांबे, उपसरपंच नरेंद्र पाटील, माजी सरपंच कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध आजाराची काळजी कशा प्रकारे घ्यावी याचे मार्गदर्शन डॉक्टरांनी केले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदिप सराफ, विलास पाटील, स्वप्निल पाटील, समाधान पाटील, धनराज पाटील, बालू श्रावने, विजय देवरे, इंदूर परदेशी तसेच डॉ. जितेश पाटील, भरत पाटील, डॉ. एल. टी. पाटील, डॉ. एस. आर. पाटील, डॉ. अभिषेक पाटील, डॉ. दिपक चौधरी, डॉ. राजेंद्र परदेशी, सतिश बोरसे उपस्थित होते. शिबीर यशस्वीतेसाठी संजय पाटील व सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.