जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२२ । धरणगाव येथे चंदन गुरु क्रीडा प्रसारक मंडळातर्फे हनुमान जयंतीनिमित्त १७ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता इंदिरा गांधी कन्या विद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रीय खुल्या कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत देशातील नामांकित पहिलवानांचा कुस्त्यांचा सामना रंगणार आहे. यात राष्ट्रीयस्तरावरील जम्मू-काश्मिरचे नवीन कुमार पहिलवान, नेपाळमधील देवा थापा पहिलवान, मालेगाव येथील नाशिक केसरी सैफ पंजाबी पहिलवान, मध्य प्रदेशातील खंडवा येथील शुभम यादव पहिलवान, काेकणठाण येथील आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे महेश फुले पहिलवान, धुळे येथील समिर पठाण पहिलवान हे प्रसिद्ध मल्ल सहभागी होतील, असे अध्यक्ष प्रकाश मराठे यांनी कळवले आहे.