जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२२ । पाळधी तालुका धरणगाव येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री संत सावता महाराज मंदिरा जवळ महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावर्षी देखील १२५ व्या जयंतीनिमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व फुले प्रेमी बांधवांनी मोठ्या संख्येत आपली उपस्थिती नोंदवली होती प्रसंगी ना. गुलाबराव पाटील, दिलीप पाटील, जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, माजी प.स.सभापती मुकुंद नन्नवरे, माजी सरपंच हेमंत पाटील, माजी सरपंच चंदू माळी, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, जीवा सेना तालुकाध्यक्ष गोपाळ सोनवणे, संत तुकाराम मराठा सेवा मंडळाचे उपाध्यक्ष भगवान मराठे,सामाजिक कार्यकर्ते संजू माळी,सरपंच पती शरद कोळी, ग्रामपंचायत सदस्य दिगंबर माळी, पप्पू माली, सुरेश ननवरे, युवाउधोजक भुषण पाटील, अरविंद मानकरी,सुनील पाटील,राजू पाटील ,चंद्रमणी नन्नवरे, आबा माळी, यासह सर्व जाती-धर्माचे समाज बांधव उपस्थित होते.