⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | सोने - चांदीचा भाव | सोने पुन्हा एकदा नवे उच्चांक गाठण्याच्या तयारी ; वाचा आजचे भाव

सोने पुन्हा एकदा नवे उच्चांक गाठण्याच्या तयारी ; वाचा आजचे भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२२ । आठवड्याच्या सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाली आहे. यामुळे सोन्याच्या किंमती (Gold Rates Today) पुन्हा एकदा नवे उच्चांक गाठण्याच्या तयारी असल्याचं दिसून येतेय. आज जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याच्या भावात ११० रुपयाची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदी (Silver Rate) ३१० रुपयाने महागली आहे. त्यापूर्वी काल सकाळच्या सत्रात सोने १८० रुपयाने तर चांदी २३० रुपयाने महागली होती.

आजचा सोने-चांदीचा भाव?
जळगाव सुवर्ण नगरीत सध्या २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५३,४०० रुपये इतका आहे. तर चांदी ६८,८७० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.

आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सोनं हा सुरक्षित गुंतवणूक पर्याय ठरु शकतो. त्यामुळे सध्या सोन्याकडे गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. रशिया युक्रेन युद्धावर अद्याप तोडगा निघालेला नाही. चीनमध्ये कोरोनाने पुन्हा डोकंवर काढलं आहे. या घडामोडी सोन्याच्या किंमतीवरील दबाव निर्माण करण्यास कारणीभूत असल्याचे कमाॅडिटी विश्लेषकांनी म्हटलं आहे.

गेल्या आठवड्यात सोने ३०० ते ३५० रुपयांनी महागले आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात घट दिसून आलीय. चांदीच्या दरात ८०० रुपयापर्यंत ची घट दिसून आलीय. मात्र चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या भावात वाढ दिसून आली. दोन दिवसात सोने २९० रुपयाने महागले आहे. तर चांदी ५४० रुपयाने महागली आहे. भाव वाढीने सोने पुन्हा उच्चांक पातळीवर जाऊ लागले आहे.

गेल्या आठवड्यातील दर?
जळगावमध्ये ४ एप्रिल रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ५२,५५० रुपये होते. तर ५ एप्रिल रोजी ५२,७४०, ६ एप्रिल रोजी ५२,५८०, तर ७ एप्रिल ५२,८१० व ८ एप्रिल ला ५३,११० रुपयावर होता. तर दुसरीकडे ४ एप्रिल रोजी चांदी दर ६८,३०० प्रति किलो होती. ५ एप्रिल ६७,८५०, ६ एप्रिल ६७,७५० तर ७ एप्रिल ला ६७,८६० तर ८ एप्रिल ला ६८,३३० प्रति किलो इतका होता.

सोन्याची प्युअरीटी कशी तपासावी?
सोनं शुद्ध आहे की अशुद्ध, हे तपासणं सोनं खरेदीच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं. सोनं खरेदीवेळी त्यावर हॉलमार्कचे निशाण असतात. या हॉलमार्कवर 24 कॅरेटपर्यंतची माहिती दिलेली असते. 22 कॅरेट सोनं असेल तर त्यावर 916 असं नमूद केलेलं असतं. तर 21 कॅरेट सोन्यावर 875 असं लिहिलेलं असतं. 18 कॅरेट सोन्यावर 750 तर 14 कॅरेट सोन्यावर 585 असं नमूद केलेलं असतं.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.