जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । येथील माहेश्वरी महिला मंडळ, पाळधीतर्फे गणगौरनिमित्त गीत व भजनांचा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. गावातून गणगौरची थाटात मिरवणूक काढण्यात आली.
यात गावातील महिला व मुलींनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या हाेत्या. यावेळी माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा रेखा सोमाणी, उपाध्यक्ष सुवर्णा सोमाणी, कोषाध्यक्ष उषा कासट, धरणगावच्या अध्यक्ष सुरेखा झंवर, सचिव वैशाली सोमाणी उपस्थित होत्या. कार्यक्रमास भाग्यश्री झंवर, दीपमाला सोमाणी, सविता सोमाणी, जयश्री झंवर आदींचे सहकार्य लाभले.