जळगाव जिल्हा
इरफान शेख यांची जिल्हाध्यक्षपदी निवड
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । महाराष्ट्र ऑटोरिक्षा पंचायत संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी इरफान अब्दुल कैसर शेख यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा कार्यकारिणीपदी शेख अस्लम शेख मुख्तार यांची शहराध्यक्ष व अफसर शेखची निवड झाली.
महाराष्ट्र ऑटोरिक्षा पंचायत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबा कांबळे यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवड येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाध्यक्षपदी निवड झालेले इरफान शेख, शहराध्यक्ष शेख अस्लम व जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झालेले अफसर शेख यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी घरकाम महिला अध्यक्षा आशा कांबळे, हातगाडी पंचायतचे कोषाध्यक्ष बळीराम काकडे, वाहतूक पंचायतचे उपाध्यक्ष सदाशिव तळेकर उपस्थित होते.