गावची मुतारी झाली जमीनदोस्त, जागेवर दुसऱ्यानेच बसविले बस्तान
जळगाव लाईव्ह न्यूज । गोपाळ भारुडे । यावल तालुक्यातील चितोडा येथे अवघ्या गावात एकच मुतारी असल्याने मोठी गैरसोय होत आहे. गावातील ग्रामपंचायतजवळील मुतारी अनेक वर्षांपासून जमीनदोस्त झाली आहे. विशेष म्हणजे त्या ठिकाणी आता एका व्यक्तीने आपले बस्तान बनविल्याचे चित्र दिसून येतेय. याकडे ग्रामपंचायत अक्षरशः दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले.
गावातील ग्रामपंचायत जवळ या अगोदर मुतारी होती ती ही काही वर्षापुर्वी जमीनदोस्त झाली. तर गावात फक्त शाळेजवळ एकच मुतारी आहे. यामुळे मुतारी नसल्याने असुविधा होत आहे. पुरुषांना आपली नैसर्गिक विधीसाठी नाईलाजास्तव कुठेही भिंतीचा आडोसा शोधून आपली नैसर्गिक विधी पार पाडतानाचे विदारक चित्र बऱ्याच वेळा दिसून येते.
अनेक वर्ष होऊनही गावात मुतारीचा प्रश्न मार्गी लागत नाहीय. किमान ग्रामपंचायत जवळील मुतारी दुरुस्त होणे अपेक्षित होते तरी देखील याकडे ग्रामपंचायतने दुर्लक्ष करीत आहे. विशेष म्हणजे आता त्या ठिकाणी एका व्यक्तीने याने आपले बस्तान तिथे मांडले आहे. त्यामुळे ग्रा.प.चा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. त्यामुळे पुरुषांची मोठी गैरसोय होतेय.