जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ एप्रिल २०२१ । साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. त्यामुळे साहजिकच यादिवशी सोने महागण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापूर्वीच सोने खरेदी करण्याचा अनेकांचा कल आहे.
महाराष्ट्रातील सोन्याची प्रमुख बाजारपेठ असणाऱ्या जळगावात शुक्रवारी सोन्याचा प्रतितोळा दर ४६,६७० रुपये इतका आहे. तर चांदीचा दर प्रतिकिलो ७१,३०० रुपये इतका आहे.
आज जळगावात २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्राम ४४,४५० इतका असून तो कालपेक्षा ४८ रुपयांनी वाढला आहे. जळगावची ओळख असणाऱ्या २४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव ४६,६७० इतका असून तो ५० रुपयांनी वाढला आहे. याउलट चांदीच्या भावात तेजी असून १ किलो चांदीचा भाव ७१,३०० रुपये असून तो कालपेक्षा तब्बल ८०० रुपयांनी वाढला आहे.
राज्यातील बड्या शहरातील दर
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत शुक्रवारी सोन्याचा प्रतितोळा दर ४५,५६० रुपये इतका नोंदवण्यात आला आहे. तर पुण्यातील सोन्याचा प्रतितोळा दर ४५,५६० इतकाच आहे. तर नाशिक आणि नागपूरमध्येही जळगाव बाजारपेठेच्या तुलनेत सोने किचिंत स्वस्त आहे. या दोन्ही शहरांमध्ये सोन्याचा प्रतितोळा दर ४५,५६० इतका आहे.