जळगाव लाईव्ह न्यूज । २ मार्च २०२२ । जळगाव जिल्ह्यात कमाल तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसतेय. मार्च महिण्याच्या पहिल्याच दिवशी (१ मार्च) जळगावातील किमान तापमानात चार अंशांची वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील कमाल तापमान ३६ अंशांवर कायम आहे. तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा चटकाही वाढला.
साेमवारी १४ अंशांवर असलेले किमान तापमान मंगळवारी १८.२ अंशांवर गेले हाेते. कमाल आणि किमान तापमानात या महिन्यात वाढ हाेणार आहे. किमान तापमान १८ अंशांपुढे गेल्याने आता रात्रीचा गारठाही कमी हाेईल. आठवड्यात किमान तापमान ३६ अंशांवरून ४० अंशांवर जाण्याची शक्यता आहे. या आठवड्यात शनिवार-रविवार सर्वाधिक उष्ण असतील.
या दाेन दिवसांत जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ८ मार्चपर्यंत उन्हाच्या झळा अधिक असतील. १० मार्चनंतर कमाल तापमानात काहीशी घट हाेण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात तापमान ३५ ते ३६ अंशांवर स्थिर राहील, असा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे.
हे देखील वाचा :
- साप पकडणे जीवावर बेतले; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- राष्ट्रीय युवा महोत्सव अंतर्गत ‘भारत यंग लीडर्स डायलॉग’ चर्चासत्रात भाग घेण्यासाठी तरुणांना आवाहन
- मुक्ताईनगरमध्ये लागणार धक्कादायक निकाल; संभाव्य आमदार कोण? पाहा..
- उमेदवारांनो मुंबई गाठा! निकलाआधी शरद पवारांच्या महत्त्वाच्या सूचना, वाचा काय आहेत?