वाणिज्य

आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव ; २६ फेब्रुवारी २०२२

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२२ । रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मागील आठवडाभरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे भारतासाठी इंधन आयात महागली आहे. मात्र तूर्त निवडणूक प्रक्रिया सुरु असल्याने पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर स्थिर आहे. आज शनिवारी २६ फेब्रुवारी २०२२ रोजी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल झाला नाही.आज जळगावमध्ये (Jalgaon) एका लिटर पेट्रोलचा दर १११.२९ रुपये इतका आहे. तर डिझेलचा ९४.२० रुपये प्रति लिटर इतका आहे.

देशात गेल्या ११४ दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. येत्या काळात देशात स्थिर असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मोठी वाढ होऊ शकते, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, आजही देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.

देशात चार महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर काय?
दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर
मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर
चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर
कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लिटर

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button