भुसावळ

भुसावळातील अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरूवात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२२ । भुसावळ शहरातील वर्दळीच्या सर्वच भागातील अतिक्रमण काढण्यास गुरुवार, 24 रोजी सकाळी 10 वाजेपासून सुरूवात करण्यात आली. यावल रोडवरील महात्मा गांधी पुतळा ते जळगाव रस्त्यावरील वाय पॉईंटपर्यंत सकाळी अतिक्रमण हटवण्यात येत होते तर त्यानंतर दुपारनंतर गांधी पुतळा ते डी.एस.ग्राऊंड तसेच नवजीवन फर्निचर मॉल ते नाहाटा व रजा टॉवर ते खडका रोड भागातील अतिक्रमण हटवण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरीत भागातील अतिक्रमण पुढील दोन दिवसात हटवण्याचे पालिका प्रशासनाचे नियोजन आहे.

प्रचंड बंदोबस्तात मोहिम
यावल रोड, जळगाव रोड, जामनेर रोड, खडका रोड, जाम मोहल्ला, वरणगाव रोड या मार्गावर करण्यात आलेले अतिक्रमण प्रचंड पोलिस बंदोबस्तात तसेच पालिकेच्या सुमारे 70 कर्मचारी व ठेकेदारीच्या कामावरील 30 मिळून शंभर कर्मचार्‍यांच्या सहभागाने हटवण्यात येत आहे. मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी शहरातील सर्वच भागातील अतिक्रमण काढण्यावर भर दिला आहे. यासाठी शहरातील सुमारे 300 पेक्षा अधीक अतिक्रमणधारकांना पालिकेच्या माध्यमातून नोटिसा बजाविण्यात आल्या आहे. पालिकेच्या कारवाई पूर्वीच अतिक्रमणधारकांनी अतिक्रमणे काढून घ्यावीत, असे आवाहन पालिकेतर्फे केले आहे. शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले आहे, वाहतूकीला अडचण ठरणारे अतिक्रमणासोबतच पक्के अतिक्रमण सुध्दा काढण्याचे नियोजन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दोन जेसीबी, सात ट्रॅक्टर
अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेतर्फे सुमारे 100 कर्मचारी व मजूरांचा ताफा राहणार आहे. त्याच्या माध्यमातून अतिक्रमण काढले जाणार आहे. यासाठी दोन जेसीबी मशीन व सात ट्रॅक्टर राहणार आहे. या माध्यमातून अतिक्रमणावर हतोडा पडत आहेहे. मुख्याधिकारी संदीप चिद्रवार हे यावेळी उपस्थित आहेत.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त
डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, शहरचे पोलिस निरीक्षक गजानन पडघन, बाजारपेठचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह दुय्यम कर्मचारी, आरसीपी प्लॉटून जवान बंदोबस्तासाठी तैनात आहेत

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button