जळगाव लाईव्ह न्यूज । २० फेब्रुवारी २०२२ । तापी नदी पात्रामध्ये मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या २० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. अक्षय राजू सपकाळे (वय २०) असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
याबाबत असे की, जळगाव तालुक्यातील धामणगाव येथील रहिवासी अक्षय राजू सपकाळे हा तुरखेड शिवाराजवळ तापी नदी पात्रामध्ये मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडायला लागला. सोबतच्या मित्रांनी आणि ग्रामस्थांनी त्याला तातडीने बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मात्र तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राची सुरतवाला यांनी तपासून त्यास मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. अक्षय सपकाळे याचे आई, वडील शेती करतात. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
हे देखील वाचा :
- मुंबई-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात अमळनेरच्या दाम्पत्याचा मृत्यू
- जळगावात शिंदे गटाने फिरवली भाकरी; जिल्हाप्रमुखपदी विष्णू भंगाळे यांची नियुक्ती !
- सावद्यात लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- BRO Bharti : सीमा रस्ते संघटनेत 10 पाससाठी सरकारी नोकरीची संधी; तब्बल 411 पदांसाठी भरती
- रूद्राक्ष टीमचे कुटुंब नियोजन पथनाट्य ठरले प्रथम विजेते