जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२२ । जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात ५ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (१) व (३) जारी करण्यात आले आहे. अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी याबाबत कळविले आहे.
शासनाच्या आदेशानुसार मनाई आदेश लागू केलेल्या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास संबंधित स्थानिक पोलिस ठाण्याच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.
हे देखील वाचा :
- मद्यपान करून बस चालविणे भोवले; चालकावर निलंबनाची कारवाई
- डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडीकल कॉलेज, हॉस्पीटल आणि रिसर्च सेंटरतर्फे सुवर्ण प्राशन संस्कार
- जळगाव शहर हादरले; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर जबरी अत्याचार
- ग्रॅज्युएट्स पाससाठी खुशखबर! स्टेट बँकेत 13,735 जागांसाठी जम्बो भरती, पगार 47000 मिळेल
- सोयाबीन विक्रीसाठी नोंदणीला मुदतवाढ, ही आहेत शेवटची तारीख